पंढरीच्या नायका नायका नायका पंढरीच्या नायका ॥धृ॥
कबिराचे शेले विणितो जन संगे शेण वेचितो शेण वेचितो शेण वेचुनी जाय निघोनी जनी मारी हांका ॥१॥
सावता माळ्याची भाजी खुडोनी-रक्षीयले नामा दरजी बेदरी जाऊनी दामाजीचा दिधला हा पैका हा पैका हा पैका ॥२॥
गोराबाचे बाळ उडविले कान्होपात्रा ती उद्धरीली ध्रुवासी त्या अढळपदी बसतिले का ॥३॥
म्हणे कान्होपात्रा ये जगजीवना नेम लागेल तुझीया चरणा आला जिवीचा सखा ॥४॥