त्रिगुणाची चुल करुनी तयार पंचभुताचे भांडे त्यावर । उन उन चहा घ्यावो गोविंदा घ्यावो मुकुंदा विनवीली दासी पदरविंदा ॥धृ॥
प्रेमाची उकळी त्यातुनी फुटली सत्वाची साखर त्यात मिसळली ॥१॥
राम नाम चहा त्यात टाकीती निंदा अस्तुतीवर झाकण देती ॥२॥
ज्ञान विलायची त्यात टाकीती अज्ञान फोल फेकोनी देती ॥३॥
वर चेतनली गाळुनी घेती सत्वाचे दूध त्यात मिसळीती ॥४॥
ज्ञान हा कप बुद्धी ही बशी आत्माराम हा आहे दीनदासी ॥५॥
वैराग्य केशर भवरंग आला हा संतोष झाला । उन उन चहा घ्यावो गोविंदा घ्यावो मुकुंदा विनवीती यादव पदारविंदा ॥६॥