पिवळा पितांबर हिरवारे जामा विटेवरी विठुराया । दे दर्शन पंढरीराया ॥धृ॥१॥
शांत वाहे चंद्रभागा भक्त स्नाने करीती शुद्ध झाली त्यांची काया ॥२॥
गळा तुळसी हार घाली बुक्का लावी भाळी नैवेद्य दाखवी पेढे लाह्या ॥३॥
संत नाचे विणा घेऊनी आम्हासी द्या मनी भजन कराया ॥४॥
चंचल मन गुंतले संसारी आवरी प्रभु मोहमाया ॥५॥
ऎसी विनंती करीते चरणी विसरु नका मुक्ती द्याया ॥६॥
करा उद्धार दासीचा या आशा मोठी चरणी आपुल्या घ्याया ॥७॥