गौरी , सावित्री, लक्ष्मी तिघी जणी दाटल्या गर्व अभिमानी । तेव्हा त्वरितची आले ते नारदमुनी । पुसती तया लागूनी । महा पतिव्रता ऎकुनी तिची कीर्ति अंतरी वाटते खंती । तिशी छळवुनी याल तरी तुमची प्रीति । नाही तर प्राण का उरती असे म्हणुनिया वेगं वेगं चालले देव तिघे । अतिथांचे घेऊनी योगे । त्यां अत्रीचा पर्वत जवळी आला दाखवी एकमेकाला । बहु आनंदे गेले त्या पर्वता । गुफेत मुनीची कांता । या भिक्षेना शब्द कानी ऎकतां । गर्जना झाली बहुदां । काही फळे मुळें घेऊनी आपुल्या हाती । बाहेर आली त्वरीत । ते म्हणति नग्न व्हावे । भोजन आम्हां हरावे । आपुले ब्रिद्र राखावे । मग पतिस्मरणीं शीर ठेविले हात । बालके झाली त्वरीत । हे बाळ तिने घेऊनी आपले करी । पाळण्यातं घाली नारी । ह्या पाळण्याची प्रेमा लावूनी दोरी । गीत गाती नानापरी । सांडूनी सर्व वैभवा । ग्रह आला आमच्या देवा । सुखी निद्रा करी केशवा । ह्या कांतेचा संशय दूर कराया । नीज नीज बाळा दत्तात्रया ॥ बाळा जो जो रे जोजो दत्तात्रया । निजविती माता अनुसया ॥धृ॥
तू शीव मूर्ति ऎकुनी तुझी कीर्ति । स्मरताची पापे हरती । हे विभूतिचे उधळण अंगावरती । त्रिशूळ , डमरू हाती । ह्या रुद्रांक्षा माळा गळा लोंबती । भूषणी नाग डोलती । विजयाची हळहळ अंगा । मस्तकी धरली गंगा । लागला स्त्रीच्या संगा । ही व्यर्थची रे जर्जर करिती जाया । नीजं नीज ॥२॥
बहु तप करिता झाली तुमची माता । संसार हरिली चिंता । पाळण्य़ात निजविता । परोपरी ओव्या गाता । लोटले दिवस बहुता । जेव्हा गृहाकडे चिंता करी कांता । म्हणे काय करावे आता । तो मुनी मागे नारद आला होता । कुणीकडे असेल तो आता । आता का रडता आपटुनी आपला माथा । हा बोल कुणा लाविता । गडबडा लोळे धारणीशी । आमच्या पतिच्या बहुनी । पति पाहु आमुच्या नयनी । उपकार होतील आमुच्या शिरी । घेऊनी निघाला नारी । गिरी पर्वत चढता संकट मोठे । चरणाशी रुतती काटे । वृंदका जाळ्या पाहुनी मनी भय वाटे । चीर चोळी गुंतुनी काटे । अरण्य घोर अचाट । ठायी ठायी वृक्ष घनदाट स्त्री उष्ण बहू नाही सुखाचा वारा । अभिमान फिरकी गरगरा । बहू संकटी पावल्या अनुसायाच्या द्वारी । नारद गुप्त झाले झडकरी । नाही आधार रडती दीर्घस्वरी । अनुसया आली बाहेरी । अनुसया म्हणे धन्य माय ईश्वरी । करी कृपा आम्हावरी । हे बाळ तिने आणूनी ठेविले पुढे । घ्या आपुले अक्षय चूडे । हे बाळ तिन्ही ऎसे लहान । रहाती अंधार जगी मग किती । तू शिव विष्णु ब्रह्मादेव त्रैमुर्ति । बाळ लघुचे थोर होती । बाळ लघुचे थोर झाले । अनुसया गहीवर बोले । अभिमान सर्व गळाले । बहू भीतिने कुणापाशी गीत गाऊ । बाळ तुझे होऊनी राहू । हे बाळ तिन्ही सवेच दत्त झाले । दुसरे देह निर्मिले । ह्या त्रैलोकी नवल मोठे झाले । नाव दत्तात्रय ठेवले । मातेच्या चरणी लागले । येतो माते स्मरशील निज अंतरी । दत्ताची तेथे फेरी । बाळा जो जो रे ॥३॥