कृष्ण नावाडी नावाडी न्यावे मज पैलथडी ॥धृ॥
भवसागरी बुडत असता काढी मज तु तात्वता तुझ्या नामाची लागो गोडी ॥१॥
गोकुळात खेळ खेळला, गोपिकेचा चाकर झाला , नंद यशोदा घरी राहिला गोपीसंगे नाचे आवडी ॥२॥
भक्ताघरी करी तो काम नाही वाटले त्यासी श्रम जनीसंगे दळण दळी नाथा घरी आणि कावडी ॥३॥
द्रौपदीचा बंधु शोभला अर्जुनाचा सारथी झाला यज्ञामध्ये उचिष्ठ काढी ॥४॥
माया मोहाने मज व्यापिले दाखवी चरण तू आपले तुजसी रुक्मिणी हात जोडी न्यावे मज पैलथडी ॥५॥