षड्रिपु जाळियले भक्तिने दूध तापविले प्रेमभर आतविले घातिले शर्करा ॥
सुप्रभात थोडे तरी रे दूधघेई प्रभुवरा दूध घेई सुंदरा रे दुध घेई प्रभुवरा ॥१॥
शांत कि विचारी मजला कि आज भाग्य उदय झाला नयनशामा
सुंदरा रे नयनकृष्णा सुंदरा ॥२॥
दूधपात्र भरोनिया करी उभी यशोदा सुंदरी आत येई श्रीहरी रे विनविते किंकरा ॥३॥
राधा बोले यशोदेला हरी बाहेर का नाही आला कमल नयना शामसुंदरा रे
चरणी लागू दे मला ॥४॥