म्हणे रुक्मीणी चक्रपाणी आज आहे हो हरीदिनी ॥धृ॥
दूधपाक हा साखर लाडु बत्तासे खाजी करंज्या राजगिरीच्या भगरीचे हे अनारस ॥१॥
केळी नारळी पेरु डाळींब फणस आंबा मोसंबी द्राक्षे अननस खिरण्या बोरे अंजीर आवडे ईडलिंबू ॥२॥
काजू जरदाळु खारीक मनुका बदाम पिस्ते बेदाणा आक्रोड सुकेकेळ खजुर चारोळी हरीशी वाढे रुक्मीणी मोरांबा आवळा वाढोनी ताट वाढोनी पाट मांडीले ॥३॥
सुंगध झारी भरुनी रताळ्याच्या चकल्या फेण्या श्रीखंड वाटी भरुनी खरबुज टरबुज एरंड काकडी हरीशी वाढे रुक्मीणी ॥४॥
शेंगादाण्याचे लाडू थालीपीठ सुधारस वाढोनी तुत तोरण चिंचा कौठ पुंड्या ऊस सोलोनी ॥५॥
साय दूधाची खडीसाखर खडीसाखर खवा किसमीस आणोनी दही दूध लोणी धृत साखर लवंगा न वेलदोडे देवोनो मस्तक ठेव चरणी