मुरलीवाला मुरलीवाला प्रेमाने गावु त्याला देव भावाचा भुकेला ॥धृ॥
संत सखु घेई नाम श्वशुरगृही करी काम , मनी विठ्ठल चिंतन तिजसाठी सून झाला धाडीले पंढरीला देव भावाचा भुकेला ॥१॥
जनीसंगे दळण दळीता आळवी गोपीनाथा , ये धावत पंढरीनाथा जगजेठी हरीकंठी काढूनी दळू लागला ॥२॥
एकनाथा घरी पाणी आणी गंगेच्या कावडी , घाली, धोतराची घडी-स्नान करुनी सोवळ्यानी उगाळी चंदनाला ॥३॥
द्रोपदीचा छळ भारी फेडी वस्त्रे दुराचारी , ये धावत बा श्रीहरी, समयाला तो आला पुरविले महवस्त्राला ॥४॥
श्रीकृष्ण शेषशाही भक्तांच्या पाठी राही , ये धावत कृष्णाबाई तारी बाला अंती मजाला नमी राधा हरी चरणाला देव भावाचा भुकेला ॥५॥