राम दर्शनासी चला लाभ हा बरा ॥धृ॥
रामनवमी रामजन्म नक्षत्र पुनर्वसु, सुर्य माध्यानासी समयी जन्म ब्रह्मा ॥१॥
दशरथासी दाशरथी पुत्र जाहला , त्रिभुवनात जय जय विजय जाहला ॥२॥
अबरी शबरी बदरी फळे पदरी बांधिले , भावे बळे भुकेलासी भक्षु लागले ॥३॥
समुद्र मंथुनी शंकराशी विष पाजीले , रामनाम मुखी घेता अमृत जाहले ॥४॥
वहु कोटी अन्याय क्षमा करी मला, रामदास म्हणे देवा दर्शन द्या मला ॥५॥