उठ जा गुरुचे पाय धरी उठ जा गुरुचे पाय धरी ॥धृ॥
कोठूनी आला कोठे जाणार याचा विचार करी ॥१॥
विज्ञान वैभव अधिकाराची मस्ती नाही बरी ॥२॥
अमोल्य संधी जाते वाया सांडीसी खुन खरी ॥३॥
प्रपंच नाचणी संपवी आता सांडीशी सर्व दुरी ॥४॥
जगदीशे बोले विरक्त असता संधी आहे बरी ॥५॥