रामा तुजविण कोणी न मज तारी देवा तुजविण कोणी न मज तारी ॥धृ॥
आजवरी पुजीले तुजसी जरी रतले मन संसारी ॥१॥
पोटासाठी रांत्रदिन हिंडविसी रानोरान काळ घीरट्या घाली ॥२॥
मिळविले बहुत धन केले नाही कवडी दान खेद वाटे अंतरी ॥३॥
झिजविली सुंदर काया मनीवाटे गेली वाया काळ घिरट्या घाली ॥४॥
सद्गुरु नाथा मज अनाथा तारी तारी तु आता जन्म मरण भयवारी रामा तुजविण ॥५॥