पंढरीच्या पांडुरंगा भेट दे मला हरी रे भेट दे मला ॥धृ॥
आषाढीची यात्रा आली चंद्रभागे स्नान करी पुडलिकाचे दर्शन घेता आठवु तुला हरीरे आठवु तुला ॥१॥
दर्शनासी उत्सुक झाले धावूनी मी राऊळा आले अष्टगंध तुलसी बुक्का वाहू दे तुला हरी रे वाहु दे तुला ॥२॥
बदाम खडीसाखर पुढे नैवेद्याला आणिले थोडे धूप दिप नैवेद्य अर्पिते तुला हरी रे अर्पिते तुला ॥३॥
विनविती यशोदाबाई दुसरे काही मागत नाही, भक्ती जडो हरीच्या चरणी मागणे तुला हरी रे मागणे तुला ॥४॥
अनन्य भावे शरण मी आले परतुनी मुखाकडे पाहिले संकट पडता धावूनी आले विघ्न टाळीले हरी रे विघ्न टाळीले ॥ पंढरीच्या पांडुरंगा ॥५॥