समय बुक्याचा हा झाला हा झाला हार तुरे घालु हो गुरुला समय ॥धृ॥
नमुनी गणपति श्रीपतिला दत्तात्रय गजाननाला ॥१॥
संचित कामासी की जाळूनी भोग सुंगधित केला ॥२॥
पुष्पें सुंगधिते प्रेम भक्ताची स्वानुभवे गुंफियला ॥३॥
भक्तिसी तुटला गुरुपदीं मुरला परी परसुनी आला ॥४॥
ऎसा सद्गुरु सखा जन्ममृत्युचा झोका दिधला ॥५॥