कोण श्रेष्ठ परीक्षु मनी म्हणती भृगुमुनी जाती कैलासवासी शिव ते सिंहासनी धरी वामांकावरी सु हिमाचल नंदिनी भृगू जाता तेथे झाली मान खंडणी हा तामसी याते शास्त्र नसे अंतरी । का पतिला टाकूनी आलीस कोल्हापूरी दे दर्शन अंबे धावा पाव झडकरी ॥१॥
तो सृष्टिकर्ता रचनेमध्ये गुंतला कोण सदनी आला, भान नसे त्याजला जावे वैकुंठासी पाहु त्याची कला रत्नजडित मंचकी शेष शयन निजला ती सिंधु तनया कोमल चरण चुरी ॥२॥
विधी तान असा तो अनंत शय्येवरी पाहूनी भृगुने लाथ मारली उरी इंदिरा रमण तो धावूनी चरणा धरी मी विषय सुखाच्या निजलो शेजेवरी मम हृदय कठिण किती कासव पृष्ठापरि श्रम झाले मुनिला लाथ मारिता उरी म्हणे लक्ष्मी आणि घृत जाऊनी झडकरी तु वाम चरण चूर दक्षिण चोळीत हरी ॥३॥
पाहुन लक्ष्मी संतापे अंतरी नको संगत तुमची जाते मी करविरी दास्यत्व निरंतर करीत असता तुम्ही हरी नाही लाज तुम्हाला काय म्हणावे तरी परब्रह्मा आहा तुम्ही लाथ मारितो उरी त्या ब्राह्मण अधमा दया नसे अंतरी आजपासूनी त्यांच्या राहात नाही मी घरी ॥४॥
चार वर्णामाजी श्रेष्ठ विप्र मानिले विधी धावा ऎकुनी चव वेदा रक्षिले त्या गजेंद्राचे ब्रीद मी सांभाळीलें त्या अंबरीशाचे गर्भवास चुकविले त्या प्रल्हादाला संकटी मी सांभाळीले त्यां अंबरीशाचे गर्भवास चुकविले त्या प्रल्हादाला संकटी मी पाळेले ते ध्रुव बालक मी अढळपदी बसविले त्या सुकामजीला दिधली कांचनपुरी ॥५॥
पति वाक्य ऎकुनी अंबा नमिपाऊले -करविरा येऊनी सिंहासन स्थापिले , स्थिर कंचुकी नेसुनी मुकुट कर्णी कुंडले मणि मंगळसुत्र भाळी कुंकु शोभले करी कंकण घालुनी नुपुर चरणी भले ते रुप पाहुनी मन माझे गुंगले , शेजारती घ्याया नित्य येती श्रीहरी ॥६॥
ज्ञानज्योत घेऊनी नाचत कृष्णा सती स्वानंद मंडपी गोंधळ ही घालती झोटींग काम हा गाजीतसे दुर्मती , भवताप निवारुनी देई मला सन्मती श्री भागवतामध्ये व्यास कथा वर्णिती अभिमन्यू सुतास शुक प्रेमे सांगती महाकाली महालक्ष्मी सरस्वती हे अनाथ नाथे तारी तारी मज प्रती , हे जनजननी तू ठेवी अगम्य कर शिरी । दे दर्शन अंबे धावा पाव झडकरी ॥७॥