कैकयी सहज मजसी पुसु लागली - आंगुष्टाची आकृती तिनेच बनविली आगुष्टाची आकृती लिहुनी दाखविली आंगुष्टाचा दशासुर तिनेच बनविला रामचंद्र तुम्हा माझा त्रास का आला ज्यावेळी जो हट्ट तुम्हीच पुरविला रामचंद्र ॥धृ॥
गृही येता दैव कसे उभे राहिले तुमच्या कानी वैरीयाने शब्द ऎकीले पुन्हा मझ्या नशिबानी धावच घेतले ॥२॥
मजसी सोडण्या लक्ष्मण पाठविली नेत्रांतुन पाणी मात्र त्यानीही काढीले घोर वनी सोडुनी मला रथच फिरवीला ॥३॥
तातोबाच्या गृही सर्व भोगीले लव कुशबाळ त्यानी हो माझे रक्षीले आता चरणाची भेट द्यावी गंगेला ॥ रामचंद्र ॥४॥