सयानो पंढरपुरा जाऊ एक विटेवरी ब्रह्म उभे ते पांडुरंग पाहू ॥धृ०॥
साधु संत बरोबर घेऊ दिंडी पताका टाळ मृदुंग भजनी वेळ जाऊ ॥१॥
पूजेची सामुग्री घेऊ पंचामृत धूप करोनी तुळसी बुक्का वाहू ॥२॥
मधु मिष्ठान्न पक्वाने घेऊ भक्ति भावे ताट रुप्याचे नैवेद्य लावू ॥३॥
तसे गुंजचे तांबुळ ठेऊ नमो नमो प्रदक्षिणा घालुनी तुळसी बुक्का वाहू ॥४॥
सायानो पंढरपुरा जाऊ ।