पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ओवाळीती तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी ॥धृ॥
पुंडलिकासाठी देवा ईथे आलासी विटेवरी नीट उभा करकटेसी सभा मंडपात उभा गरुड शेजारी ॥१॥
एकानाथा घरी पाणी वाहसी नामदेवा संगे एका ताटी जेवीसी जनाबाई सुळी देता तुच रक्षीसी ॥२॥
दामाजी पंतासाठी महार झालीस कानोपात्रा कळवंती चरणा नेलीसी मिराबाई विष प्याला तुच भक्षीसी ॥३॥
सावत्याची भाजी खुडूनी भारा बांधीसी कबीराचा शेला विणुनी घडी घालीसी कर्माबाईची खिचडी खाता तृप्ती झालासी ॥४॥
इतके भक्त मिळुनी तुझी दृष्ट काढीसी रुक्मिणी विनवितो हरीच्या चरणाशी ॥ ओवळीते तुला रे देवा ॥५॥