उन उन चहा तुम्ही घ्यावो गोविंदा घ्या राम राया
विनवीती तव बाल विकाया ॥धृ॥
त्रीगुणाची चुल केली तयार-पंच भुताचे भांडे
त्यावर प्रेमाचे पाणी ओतीले
भांड्यात वैराग्य मसाला मी टाकीते
त्यात ज्ञान विलायची सोलोनी टाकीले
अज्ञान फोल फेकोनी देते ॥१॥
षडरिपु सगळे जाळोनी देते
निंदाही ज्वाळा मी त्या लावीते
प्रेमाची साखर बुद्धीचे दुध-
राम नाम चहा मी त्या लावीते-
प्रेमाची उकळी आतुनी आली
राम रुपवरती रंगुनी गेली ॥२॥
बौद्धाच्या चाळणीने चहा गाळीला
अहंकार चोथा फेकीनो दिला
बुद्धीचे कप सत्वाची बशी
नर्मदा विनवीती पदकमलासी ॥
उन उन चहा घ्यावो गोविंदा घ्या राम राया ॥३॥