मनमोहना मधुसुदन श्रीरमणा का न ये तुम्हाला बहिणीची करुणा ॥धृ॥
पांडव असता वनवासामध्ये भारी त्यामध्ये मुरारी दुर्योधन हा वैरी प्रार्थना ऋषींची गर्जती नानापरी मागती हो अन्न कोठे नसे बा तिळभरी ॥१॥
तेव्हा दासाने ऋषी पाठविले स्नाना येईना कशी करुणा तुज रे मनमोहना ॥२॥
येतील ऋषीगण शापीतील अवघ्यासी मग कळेल तुजसी तुच ऋषीकेशी आबादी कैशी बहु तुज आळवायासी बहु तुज विनवायासी झाले ग बहु आळसी या मज दुबळीसी ॥३॥
ऎकुनी श्रवणी बहिणीची दीनवाणी आले ग हृदय भरुनी अश्रु श्रवती नयनी जवळ रुख्मीणी शब्द पडे हा कानी ॥ मन मोहना मधुसुदन श्रीरमणा ॥४॥