माहुर गडावरी तुझा वास-भक्त येतील दर्शनास भक्त येतात दर्शनास ॥धृ॥
पिवळे पातळ ग पातळ बुट्टेदार - अंगी चोळी ती हिरवीगार- लाल पैठणीची खोविली कास ॥ भक्त० ॥१॥
सरी ठुसीकी ग ठसी की मोहन माळ पायी जोडवे पैंजण चाळ पट्टा सोनियाचा सोनियाचा कंबरेस ॥ भक्त० ॥२॥
बिंर्दाबिजवराग बिजवरा भाळी भोभे कानी कापाचे सुंदर झुबे-तुझ्या नथेला ग हिरवाघोस ॥ भक्त० ॥३॥
तुझ्या हातात गे हातात पाटल्या गोठ-तुझ्या कपाळी कुंकवाचा मळवट ॥ भक्त येतात ग येतात दर्शनास ॥ भक्त० ॥४॥
जाई जुईची ग जुईची आणीली फुले भक्त गुंफिती हार तुरे गळा घालिती ग घालिती अंबीकेच्या ॥ भक्त० ॥५॥
पुरणपोळी की ग पोळी ती भोजनाला-मुखी तांबुल देते तुला, ओटी ग घालिती घालिती नारळास ॥ भक्त० ॥६॥
ऎसी गाईली ग गाईली मानसपुजा -प्रेमे आंलीगीली अष्टाभुजा-मनी धरावी मनी धरावी दृढ आस ॥ भक्त येतील दर्शनास माहूर गडावरी गडावरी तुझावास .॥ भक्त० ॥७॥