तुळजा देवी ही सर्वाची आई । दु:ख संकटे निवारुनी नेई । भक्तासाठी धावूनिया येई ॥धृ॥
अक्राळ विक्राळ उग्र रुप धारिले । चंड मुंड राक्षस मारिले । महिशासुराला हिने हो मारिले , अष्टभुजा दुर्गादेवी झाली ॥१॥
सोनेरी मुकुट माथ्याला । कंचुकी हिरवी अंगाला मंगळ सुत्र हार गळ्याला सिंहावरी स्वार ही होई ॥२॥
शंख चक्र गदा शोभे हाती । तुळजापुरी निवास ही करीती । बहुत जन दर्शना येती । तुझी छाया सर्वावरती होई ॥३॥
संसारात व्यापुनी गेले । माया मोहाने बहुत पिडीले , दाखवी चरण तुही आपले । शांतास निजधामा नेई ॥४॥