आधी नमीते गणपती देवा सरस्वती धावा मांडीती द्रोपदी पापाला हरणा । कृष्ण धावा रे लवकरी संकट पडले भारी हरी तु आमुचा कैवारी आले विघ्नवारी देवा धाव रे लवकरी ॥धृ॥१॥
पांडव आसता वनवासे कळले कौरवासी त्यानी पाठविले हे ऋषी सत्त्व हरायसी ॥२॥
रात्र झाली से दोन प्रहर आले ऋषीश्वर , भोजन मागती सत्वर करु कैसा विचार ॥३॥
तुझा भरोसा मज आहे म्हणुनी ऋषी आहे त्याने पाठविलेस, लवलाये येऊनी करशील साये ॥४॥
आज का निष्ठूर झालासी कुठे गुंतलासी , माझी होईल बागति कैसी अनाथ मी परदेशी ॥५॥
आज काय लावीला उशीर म्हणूनी चिंता फार , विनंती करीते तुज फार कर एवढा उपकार ॥६॥
आज काय लागली तुला झोप म्हणुनी माझे पाप मजवर काय धरीला हा कोप तुच माय बाप ॥७॥
साता खंडीचे हे अन्न दुर्वांसी भोजन वन मी एकली तुजवीन तजील आपला प्राण ॥८॥
कुठें गुंतलासी जेवाया पक्वाने , सवायी मी कष्टी आहे देवराया ये संकट हाराया ॥९॥
कंठ शोषला अनंता प्राण जाईल आता, पदर पसरीते तुज दाता हे रुक्मीणी कांता ॥१०॥
तुझी बहीण मी धाकटी अन्न घाली पोटी देव उठविले जगजेठी चरणा घाली मीठी ॥११॥
ऎकुनी बहीणीची करुणा आला यादव राणा द्रोपदी धावुनी लागे चरणा उद्धव जगजीवना ॥ कृष्णा धाव रे लवकरी ॥१२॥