काजळ कुंकू हळद लागली तुम्हा कुठूनी श्रीपती, तुमच्या मंचकावरी रात्रीची कोन निजली, सखी, पैठणी पातळ चोळी अंजीरी मेंदी लावीली नखी-झारी उदकाची भरुनी ठेवीली तबकी पेढे बरफी वेलची, लंवगा पिकली पाने विर्क सुपारी चिकण, तुमचे अंगी रुतले सांगा कोणाचे कंकण हरी हो कोणाचे कंकण ॥धृ॥१॥
रुख्मीणी बाळे ऐक विल्हाळे गूज सांगतो तुला, अंधपुत्राने सभेसी आणिली छळीले द्रोपतीला, लगबगीने धावत गेलो आलींगिली तीला सखेग आलींगिली तीला तिच्यागोठ तोड्याची खुण उमटली गालाला-चंदन सुवासिक अत्तर अरगजा वास तिच्या अंगाला, धुंद कशाने होऊनी गेला मुखी विडा रंगला सोळा सहस्त्र कामीनी असता मंचीकी आणिली कोण ॥२॥
ऐक रुख्मीणी अमुचे वचनी विश्वास ठेवूनी सखेग विश्वास ठेवूनी, राजसुय यज्ञामध्ये उग्र पूजा केली होती, धर्माने चंपक केतकी माळली शेवंती हार गळा घालूनी-आली सुभद्रा भेटली मजला दिला विडा करुनी, श्रमबहू झाले नेत्र धुंदले झोप नाही म्हणूनी सखेग झोप नाही म्हणूनी ॥३॥
शाम सुंदरा भामावरा दासी तुझी इंदिरा, दिनानाथा करिते स्तुती परस्परा सोयरा, नारद मुनीजन ऐसे तुज ध्यासी सदा योगीजन । तुमचे अंगी रुतले सांगा कोणाचे कंकण कमल लोचन पुतना शोषणा प्रभुच्या हृदयी खुण हरी हो प्रभुच्या हृदया खूण-तुमचे अंगी रुतले सांगा कोणाचे कंकण ॥४॥