चोविस तासांतून तरीरे स्मर हरी थोडा वेळची रे ॥धृ॥
गाडीचे जू मानेवरी बघ घाण्याचे बैलापरी जीवासी शांती नाही रे ॥१॥
स्वार्थासाठी सर्वही व्यवहार त्यातच राहूनी घ्यावे सार होऊ नको अविचारी रे ॥२॥
स्वार्थासाठी सर्वही झटती परमार्थाला दूर लोटीती यांत न मानवताही रे ॥३॥
वेळ किती तरी व्यर्थची जाई एकेक क्षण म्हणता पाही गेला वेळ न येई रे ॥४॥
काय करावे वेळच नाही असे म्हणुनी चुकवु पाही मनासी कैसा चुकविशी रे ॥५॥
जावेरी देह तोवरी कर्म मरणही येता त्याचे बंधन आपले स्वहीत तू पाही रे ॥६॥
तुकड्यादास म्हणे जनासी तुम्हासी साथ नाही कुणाची एक प्रभूची घेई रे ॥७॥