चौरंगी पाणी सारीती चला उठा स्नानास खास मज
रामपदाची आस खास मज कृष्णापदाची आस ॥धृ॥
रामसख्याला आपल्या हातानी उटणॆ लावु अंगासार
पिवळा पितांबर हिरवे कांठी ठेवूनिया आसनात केशर
कस्तुरी गंध अक्षदा आरसा घ्या पाहायास
उदर शिंपडीती गुलाब पाणी घ्या गजर्याचा वास
भोजन करीता पान वाढीले उचला दोनच घास ॥
मुखशद्धीला गोविंद विडे ठेवूनी ताटांत
वचन दासीचे मानी ऎकूनी चरणी ठेवीती आस ॥