पाहुं या विश्वंभरा बुक्का वाहुं य विश्वंभरा ॥धृ०॥
अहा चंद्रभागे काठी झाली साधु संताची दाटी तुळशीच्या माळा कंठी शिरी खोवियला तुरा ॥१॥
अहा पंढरी क्षेत्रांत विठूनाम आनंद नांदत राऊळांत झाली त्वरा ॥२॥
मुक्ताबाई दे मति भरल्या बुक्याच्या मुठी सावत्याच्या हार तुरा ॥३॥
एका जनार्दनी बुक्का तेथे भाव धरा निका । मोक्ष पदा लागीं वरा ॥४॥