रामा मजला माहीत नव्हते थोर होवूनी असे फसवाल ॥धृ॥
अंजनी सुत मजपासी येऊनी होऊनी मजला घेतले वचनी तयार केला रंगमहाल ॥१॥
मम महालासी येऊनी पाहिले आपल्या कृतीने कसे लोपविले असी का थोरांची चाल ॥२॥
मनी मी बांधीली बहुतची आशा येऊनी भेटावे मज जगदीशा चौर्याशी फेरे चुकवाल ॥३॥
दुष्ट हे भृंगे कोठुनी आले रत्नजडीत मंचक कसे पोखरीले म्हणुनी झाली अपमान ॥४॥
श्रीराम म्हणॆ वचन कृष्ण अवतारी हित पुरवीन संतापी होऊ नको लाल चंद्रसेना संतापी नको होऊ लाल ॥५॥
पतीचे मरण कसे सांगितले महापतीव्रता सोडुनी दिले गंगेसी नीजपदी न्याल रामा मजला माहीत नव्हते थोर होऊनी असे फसवाल , देवा मजला माहीत नव्हते थोर होऊनी असे फसवाल ॥६॥