हरि पदी रुचले मन माझे गुरुपदी रुचले मन माझे ॥धृ॥
अनुभव माझा हा पहिला विष्णूपदी । ओळखी गुरु वाहिला ॥१॥
साहता पाहुनी झालो दंग हृदयी आठविला सच्चानंद ।
साधन मजला काही सुचेना हरि भजना विन अन्न रुचेना ॥२॥
तुका म्हणे गुरु केला जन्ममरण फेरा चुकविला ॥३॥
हरि पदि रुचले मन माझे दीनदाळे गुरु राजे ॥४॥