श्रीराम म्हणे सीतेसी किती सांगावे विपीनाशी तुवा नच यावे ॥धृ॥
मम विरह होय बहु दु:सह कौसल्येशी समजावील कवल तियेसी मुर्छित झाला तात- सत्य तू पाहसी होईल सांग गति कैसी आहेसी प्रिये तू ज्ञाती - कर विचार बरवा चित्ती का उगीच करतीस ख्याती मध मधुर बोलोनी त्यांचे दु:ख हरावे ॥१॥
भयभीत होसी चिंत्तात परीस वचनाया नानापरी राक्षसी माया बहु क्रूर शापे फार असती त्या ठाया - का - करिसी दुराग्रह वाया , खडे कंटक रुततील पाया सुकुमार तुझी ही काया नाहीच तेथे मृदु शैया मम मातृ पितृ निज दैवत पुजुनी असावे ॥२॥
फळ मूळ जळ ही कधी काळी न मिळे तेथे सुखरुप बैस तु येथे निज जनक जाननी त्वा समजावे या दोघाते होईल सौख्य वनी माते सीते तु चतुर शहाणी, का नयनी आणिले पाणी , परिसुनी पतीची वाणी विनवेच वदे श्रीरामा मज न ते रहावे ॥३॥
श्रम नाही किमपी मज काही भय नसे चिंता , प्राणेश्वर सन्नीध असता बहु दिवस असे मज हौस सांगते आता सेवा नच आली हाता गुरु व शिष्य बोले काही सीतेशी सेवेची नेई उभयता लागती पायी वनवास चरित्र या पुढती असे की बरवे ॥४॥
इतिहास पह पूर्वीचा कठीण प्रसंगी त्यागीले कसे कांत अभागी तारामती दमयंती तशीच अश्वपती बाला जिंकीले जियेने काला ठाईच असेही सकला आणिक वंदु मी कितीक तयाची नावे ॥५॥
विपीनासी तुवा नच यावे श्रीराम म्हणॆ सीतेशी.