धाव रे पुराण पुरुषोत्तमा पाव रे पुराण पुरुषोत्तमा ॥धृ॥
सहस्त्र फण्यांचा शेष शिणला स्तुती तुझी नाही जहाली, मतीहीन मी काय वर्णु दिन मज करी क्षमा ॥१॥
नको नको मज माणिक मोती नको नको ही धनसंपत्ती न मागेची तया आती साह्य होतसे रमा ॥२॥
वायणदान तुजसी देती बहु सन्माने तुजसी अर्पीती , मुक्त करीतसे जना ॥३॥
प्रपंच्या मी विटले देवा न घडे काही तुमची सेवा , रुख्मीणीसवे निजधामा आम्हासी ने निजधामा ॥ धाव रे ॥४॥