चंद्राची चंद्रकळा जशी काय पंढरी वेल्हाळा
हात देवूनी महाराज हात देवुनी उभा विठ्ठल सावळा,
गळ्य़ामधे तुळशीच्या माळा कपाळी बुक्का महाराजा कपाळी बुक्का
केशरी तिलक जसा कर्दळी कामे कवळा
शिरीधर चीरा महाराज शिरीधर चीरा
कानी कुंडल ढाळ देती घोस मोत्याचे गर्जती ॥
छबीले सरु महाराज छबीले सरु स्वरुप विठ्ठलाचे नयनी पावे धन्य त्याचे ॥धृ॥१॥
देवळापुढे गरुडाचा पहारा नाचतो संताचा भार
टाळ मृदुंग महाराज टाल मृदुंग वाजाती झनकार
वाजती विनीयाचे तार उडवीली मजा महाराज उडवीली मजा
रंग लुटाया तुम्हासी रजा गोडनामी विठोबाचे घोस गर्जती किर्तनाचे ॥२॥
बहुप्रिती रुख्मीणीची जसी काय नरथक जायाची
अष्टनायका महाराज अष्टनायका सोळा हजार यांच्या बायका बहु प्रिती रुख्मीणीची दुधावर साथ साखराची ॥३॥
नामदेवाचे फारसे जसे काय जडावाचे आरसे देतो दर्शन महाराज देतो दर्शन
छबीले सरु महाराज छबीले सरु स्वरुप विठ्ठलाचे ॥४॥