आईचा गोंधळ गोंधळ गोंधळ घालीते - आईचा जोगवा जोगवा जोगवा मागते ॥धृ॥
काम क्रोध हे क्रोध , हे क्रोध हे महिषासुर आईने मर्दुनी मर्दुनी मर्दुनी केले चूर सत्व गुणाची गुणाची गुणाची तलवार ॥१॥
बोध संबळ संबळ संबळ घेऊनी हाती ज्ञान दिवटा दिवटा दिवटा लावूनी ज्योती-मितर रमले रमले रमले दिन रात्री ॥२॥
अलक्ष स्थळी हे स्थळी हे स्थळी हे आईचे रहान-अंबा भवानी भवानी भवानी नित्याठाय - चैतन्य स्वरुपी स्वरुपी स्वरुपी केलं एण ॥३॥
भक्त पडली पडली पडली रात्र दिन -संत पडली पडली पडली आटाआटी - विष्णु दासाची दासाची दासाची कृपादृष्टी ॥ आईचा गोंधळ गोंधळ गोंधळ घालिते ॥४॥