क्षमा करी अपराध सख्या रे किती तरी विनवू तुला-भेट घाली विठोबा मला ॥धृ॥
दामोजीने धान्य लूटोनी वाचवीली पंढरी त्याचा भार तुझ्या रे शिरी-बेदरी जाऊनी लहान होऊनी लवूनी मुजरा करी तुला काय म्हणावे हरी-संत जनाची माय माऊली कळवळ आली आली तूला ॥१॥
खांबा बांधुनी स्वगृही गेली संत सखूबाई -जिच्या पतीची सेवा केली बसूनी पलंगावरी -तुला काय - म्हाणावे हरी पाणी आण म्हणे सखुबाई घागर देतो तुला ॥२॥
एकांती जाऊनी पाटावरी बसोनी उचीष्ट भक्षण केले ते हरीने प्रगटीले-वाकळ पांघरुनी गेला पंढरीसी शोभा आली तुला ॥३॥
राधाबाई कोन निघाली सैनातूर होवूनी तिचे केलेसे बाळंतपण दासनरहरी म्हणे महीपती लीन झाल्या वाचून तुज कृपाळू म्हणॆल कोण-भक्ता घरचे कामे करता शीण नाही आला तुला ॥ भेट द्यावी विठोबा मला ॥४॥