पतित पावणा हे श्री रमणा भक्त पालका यादवा ॥धृ॥
रुक्मिणी रमणा कमल लोचना धावा आता तरी यादवा ॥१॥
द्रोपदीसाठी धावत जासी गजेंद्रासी जळी रक्षीसी या समयी अढि का धरीसी योग्य तुला का माधवा ॥२॥
स्तुति ज्या ऎसा वदती दृष्ट मार्ग हा ऋषीं केशी तारकसुजना या तव ब्रिदा बाल सुतासी दाखवा ॥३॥