उन उन कॉफी घ्यावी हो घननीळा देवकीच्या बाळा ॥धृ॥
उन उन हो कॉफी घ्यावी हो देवकीच्या बाळा ।
देहरुप अवाचीत सापडियले श्रवण बीज भुमी लावियेले ।
मनजळ आर्पियले ओघांनी वाढविले विरक्त ते फळ आले वैराग्य तोडू आला ॥१॥
शुद्ध तत्व डाळींतून काढले दुर्बुद्धी पडे जाळी ।
कामाची चुल करीता-क्रोधाचे काष्ट त्यात मंद अग्नी पेटविला ॥२॥
भक्तिच्या पातेल्यांत प्रेमाचे जल त्यात ।
दयाची शर्करा मच्छर डकळीला सुदबुद्ध गाळु याला ॥३॥
सुवर्णप्याली यात कॉफी शोभीवंत केशरी रंग नाम
वेलची दाणे क्षमा निशी धनये त्याला श्रीकृष्ण भासियेला भावेचा भुकेला ॥४॥
उन उन कॉफी घ्यावी हो घननीळा ।