खरे सांगा कोठे गेले माझे राम - रामविना चैन पडेना सुचत नाही खरे काम ॥धृ॥
घरात जाते बाहेर येते दिसेनासे झाले राम ॥१॥
चैत्र वैशाख उन्हाळा भारी अंगी सुटतसे घाम ॥२॥
अवघड वाटे रुततील काटे खडावा दिसे नसे छान चरणी रज दिसे च चरणी छान ॥३॥
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पुढे चालले हनुमान ॥४॥
नळ नीळ जांबूवंत धुंडीती सारे रान ॥५॥
खरे सांगा कोठे गेले माझे राम ।