आपण करु नमन गुरुदत्त दिगंबर चरणी ॥धृ॥
किती दिसे मनोहर नयनी दृढ भाव धरुनी मनी । जाऊं पहावया स्वरुप हर्ष लोचनी ॥१॥
करी दंड कमंडलू शंख चक्र तो करी रुद्रमाळ शोभते । पाहे गंगा वाहे सुंदरी मूर्ति विराजते सदा ही औदुंबरी ॥२॥
मन धावा घेतसे दत्तगुरुंच्या पायी रुप पाहता शांतता होई । तुज विण जग तुच्छही राही । ठेवा हो तुम्ही तयाला सदा मनी । आपण करु नमन दत्त दिगंबर चरणी ॥३॥