ज्यांच्या ध्यानी मनी राम होईल त्यांचे सारे काम बोला राम राम सीताराम ॥धृ॥
रामनामाचा जयघोष करा दशरथनंदन राम स्मरावा झाला भक्तांना आधार संत सांगे वारंवार पाण्यावरही दगड तरले रामनाम हो त्यावर लिहिले केल्या लगेच दर्यापार हनुमंताची शक्ती अपार ॥१॥
वाल्या वाल्मिकी ऋषी झालें अहिल्येला रामनी उद्धरिले केला कैकांशा उद्धार संत सांगे वारंवार ॥२॥