साईबाबा गरीबाचे वाली आशा माझी परिपुर्ण झाली . साईनाथाने कृपा केली ॥धृ॥
कैक दु:खात शिरडीस जाती खाली हाताने ना कोणी येती आशा होईल पुरी साईबाबा करी दिनानाथाची ती गुरु माऊली ॥१॥
घरोघरी साई पुजा चाले साई भक्तांच्या हृदयात डोले ज्यांची भक्ती खरी साईबाबा वरी येईल स्वप्नातली गुरु माऊली ॥२॥
जन्मा येऊनी शिरडीस जावे साई दरबार पाहुनी यावे किसन म्हणॆ खरे तुमचे होईल बरे गुरु कृपेची मिळता हो साऊली ॥ साईबाबा ॥३॥