मज दीनाशी उद्धारी मन दीनाशी उद्धारीमज दीनाशी उद्धारी गुरुराज दत्त स्वामी ॥धृ॥
साठ वर्षाची वांझ म्हातारी आली सद्गुरुचे द्वारी निरांजनाचा नेम करी वर्ष झाले तीस त्रिपुरारी ॥१॥
कमंडलु शोभे हाती पायी खडावा गर्जनी गाई श्वाना बरोबरी सद्गुरुची निघे स्वारी ॥२॥
ऎशी स्तुती करिता सारी प्रसन्न झाले जटाधारी कन्या पुत्र तीस देई भक्ताचा तू कैवारी ॥३॥
ऎसी कळवळ्याची आई भक्ता तारुनिया नेई शांता दीन होऊनिया तुज नमस्करी मन दीनासी उद्धारी गुरुराज दत्त स्वामी ॥४॥