प्रभु मज छंद तुझाची असाव छंद असावा सतत प्रभू मज विसर कधीही नसावा ॥धृ॥
दिन दयाळा तुजविण मजला नाही अन्य विसावा ॥१॥
मंदमती प्रभु तव करुणेच्या नौकेमाजी बसावा ॥२॥
तत्व जेणे प्रभु मज साजे तो सन्मार्ग दिसावा ॥३॥
बालक विनवी प्रभु भव पैकी प्राणी हा न फसावा ॥४॥