कपट वेष धरुनी मल नेले रावणे , त्याही वेळी नाही कुणी केले धावले ॥धृ॥
सुवेळेसी येऊनी मशी पाहिले उणे येऊनी कठीण मन केले आजवरी , रामचंद्र नाही घरी काय मी करु अशामध्ये कितीतरी धीर मी धरु ॥१॥
येऊनी मज दोन मास लोटले जरी राम माझा प्राण सखा काय हा करी , मजवीण प्रिया नसे त्यासी दुसरी पंचप्राण क्षीण होती किती आवरु ॥२॥
मज वृत्त जाऊनी त्यासी सांगावे कुणी जाऊनी भुवनी त्यासी आणाव कुणी नाही मजसी ताराय कुणी जवळी समय कठीण आला नाही पाखरु ॥३॥
निशदिनी मजला ध्यास लागला हर्ष झाला सीतेसी राम भेटला आनंदाचा दिवस सखे आज वाटला अखंडीत ध्यान धरुनी चरणमनी धरु ॥४॥