हे मन निष्ठुर का केले जे पूर्ण दयेने भरले ॥धृ॥
गजेंद्रांचा धावा ऎकूनी धावूनिया आले ओ प्रभु धावूनिया आले ॥१॥
प्रल्हादाच्या भावार्थाशी स्तंभी गुरगुरले प्रभु तुम्ही स्तंभी गुरगुरले ॥२॥
पांचालीचा धावा ऎकुनी वस्त्रेची पुरविले ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेने , तव पदी, मन रमले-प्रभु तवपदी मन रमले ॥४॥