जय करुनाधन भय हरिणी, भक्त वरुछले जय करूणी । तुजविण दु:ख दूर करि कोण जननी या संसारि ॥
जाऊ माहेरि ग अंबा मन्दिरि । कैवल्याचे धाम बाई नि:काम करि ग अंबा मन्दिरी गोंधळ घालुया ग जोगवा मागुया ग आदिमाया अंबाबाई ध्यानी आणु याग ॥
करविर क्षेत्री जाऊ या । अंबादर्शन घेऊ या । हळदी कुंकु वाहुया अंबादर्शन घेऊया ।
जय जयकार जय जयकार अंबा मातेचा । अंबा मातेचा जय जयकार जय जयकार ॥
जय जयकार त्रिवार जय जयकार जगत जननीचा एकमुखाने करू जयजयकार त्रिवार जय जयकार ॥