गोवर्धन तो उचलुनी धरिला, चमत्कार घडला । सखे मी गिरिधारी पाहिला ॥
इंद्र कोपला मेघ गर्जती, रुद्रवीणेच्या तारा तुटती । प्रचंड धारा कुटती विरती ।
जलमय झाला प्रदेश सगळा ॥१॥
कृष्णापाशी जाता सगळे । जगजेठी ते हांसत बोले । देवेंद्राचे कपट उमगले ।
गमंत दाखु आता त्याजला ॥२॥
देवकृपेने गोकुळ तरले, देवेंद्राचे डोळे दिपले । अपराधाने मन तळमळले,
क्षमा करावी इंद्र बोलला ॥३॥