विष्णूचिये अंगुलीचे चक्र फिरे गरगरा ॥धृ॥
अंबरीष राजा भक्त दुर्वास केला त्रस्त, भक्तासाठी वैकुंठनाथ धावतसे सरासरा ॥१॥
वक्रतुंड गजमुक्त शिशुपाल वक्रदंत जयद्रथ मारावया तेव्हा झाकी दिनकरा ॥२॥
काल चक्र फिरवी अखंड माया जगती मरती उदंड, विष्णु नाम महा प्रचंड भिडवू ऐसे अबंरा ।
विष्णु ॥३॥