धन्य अंजनीचा सुत, नाम तुमचे हनुमंत । ज्याने , सीता शुद्धी केली राम सीता भेटविली । द्रोणागिरी आणविला , लक्षुमण वाचविला । ऐसा मारुती उपकारी दास लोळे चरणावरी ॥ विमान चाले गगनोदरी, भजना लागी आले हरी विठ्ठल विठ्ठल मार हाका , श्रीहरी आले उधळु बुक्का । मारुतीराया बलभीमा, भजना लागी द्या प्रेमा ॥