विधीकुमारी वागेश्वरी हंस वाहिनी । हो प्रसन्न भजनी या रंगी रंगूनी ॥धृ॥
परब्रह्म स्वरूपाची तुच स्वामीनी । वेदाची तू जननी ब्रह्मनंदीनी ॥१॥
भक्ताची निजभक्ती मुक्ती जीवनी । स्तवन भजन सर्व भाव तुज अर्पिले ।
शारदा स्वरूप सर्व नयनी देखीले । वंदन तुज हे त्रिवार घे स्वीकारूनी ॥२॥