कटी कसूनी लाल लंगोटी भाळी शेंदुर-हातात द्रोणागिर-हातात गदा घेऊनी चाले सत्वर चाले सत्वर-भरताने मारीला हो तीर-पडे धरणीवरी महावीर लागती लागती शेर लागती शेर मुखे वदे राम रघुवीर ॥
अंजनीपुत्र मारुती तनय पवनाचा-तनय पवनाचा अत्यंत भक्त रामाचा ॥धृ॥१॥
ऐकोनी भरत पातला कपी समोर कपीसमोर-नैत्रातूनी वाहती नीर-माझी गरज काय हो तुम्हा ससो कोणाचा असो कोणाचा अत्यंत भक्त रामाचा ॥२॥
लक्ष्मणला लागली शक्ती पडले मुर्छीत झाले अवचीत-त्यासाठी आलो मी त्वरीत-संजीवनी जाऊनी गेलो वाया आणीला पर्वत आणिला पर्वत-तुम्ही केला आमुचा घात जावया नाही हो शक्ती माझ्या देहात माझ्या हृदयात अत्यंत दु:खबद्दल घाबरू नको तू बैस अश्रू तीरासी-तुला पाठवीतो राम सदनासी ॥३॥
क्रोधायमान रघुवीर शेर काढिला म्हणे आता मारु सूर्याला शोषाय मान रघुवीर उदय हा गिरीचा-आला घेऊनी तनय पवनाचावल्लीचा अर्क कोठानी मुखी हो लावीला निद्रिस्थ हिरा जागा केला सुरवर करिती आरती आनंद बहू झाला आनंद बहू झाला कलेमध्ये श्रेष्ठ म्हणविली ॥ अंजनीपुत्र मारुती तनय पवना तनय पवनाचा अत्यंत भक्त रामाचा ॥४॥