अबोला देवा मशी कां धरीला ॥धृ॥
नमन हे पडले तुमच्या हो पदरीं, आमची लज्जा तुम्हांला हो श्रीहरी कसा प्रीतिला भुलला ॥१॥
देवा तुम्हां तुळशीची आवडच मोठी, तुम्ही सांगता गवळ्याच्या गोष्टी कसा प्रीतिला भ्रमला ॥२॥
देवा तुम्हाला तिकडेची जाणे, त्यांनी मोहिली तुमचीच मने राधा बोले कृष्णाला ॥३॥
अनंत जन्मीं बहू तप केले ऋणानुबंधी पदरी मी पडले हिरव्या रंगाचा पाला ॥४॥